Random Posts

banner image

Header Ads

Basketball

IPL 2024 Latest Points Table:पंजाबला विजयाचा फायदा, गुजरातचा खेळ बिघडला; पाहा आयपीएलचे Latest Points Table

 

Ipl 2024 Latest Points Table

पंजाबला विजयाचा फायदा, गुजरातचा खेळ बिघडला; पाहा आयपीएलचे Latest Points Table

           

आयपीएल 2024 चा 17 वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाबने गुजरातचा 3 विकेट्सने पराभव केला.

या विजयासह पंजाबचा संघ यंदाच्या हंगामात 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा पहिला संघ ठरला आहे. या विजयानंतर पंजाब गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

घरच्या मैदानावर सामना गमावलेल्या गुजरात टायटन्सला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. गुजरातची 6 व्या स्थानी घसरण झाली आहे. पंजाब आणि गुजरातचे सध्या 4 गुण आहेत. दोन्ही संघानी आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यामध्ये दोन सामन्यात पंजाब आणि गुजरातचा पराभव झालेला आहे.


गुणतालिकेत टॉप 4 कोण?

तिन्ही सामने जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्स + 2.518 च्या उत्कृष्ट नेट रनरेटच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल आहे. त्यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थाननेही आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानचा नेट + 1.249१ आहे. यानंतर 3 पैकी 2 जिंकणारा चेन्नई सुपरजायंट्स तिसऱ्या आणि लखनौ सुपर जायंट्स चौथ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा नेट रन रेट +0.976 आणि लखनौचा +0.483 आहे.

उर्वरित 6 संघांची स्थिती काय?

त्यानंतर पंजाब किंग्ज 4 गुणांसह पाचव्या तर गुजरात टायटन्स सहाव्या स्थानावर आहे. पंजाब आणि गुजरातमध्ये 4-4 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये दोघांनी 2-2 जिंकले आहेत. नेट रन रेटमधील फरकामुळे टेबलमध्ये दोन्ही वर आणि खाली आहेत. सनरायझर्स हैदराबाद 2 गुणांसह सातव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आठव्या आणि दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर आहे. हैदराबादने 3 सामने खेळले आहेत, त्यापैकी 1 पराभव झाला आहे. बंगळुरू आणि दिल्ली 4-4 सामने खेळले आहेत. ज्यात त्यांना फक्त 1-1 जिंकता आले आहे. मुंबई इंडियन्सला आतापर्यंत विजयाचे खाते उघडता आलेले नाही आणि ते टेबलमध्ये तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहेत.

आज सनरायझर्स हैदराबाद अन् चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना

आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सामना होणार आहे. हैदराबादमधील राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.

संबंधित बातम्या-

पंजाबने गुजरातच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; शेवटच्या षटकांत थरार, नेमकं काय घडलं?

हार्दिक पांड्यावर चाहत्यांचा रोष का वाढला?; रवी शास्त्रींनी सांगितले यामगील एकमेव कारण!


Author- suraj Tate

IPL 2024 Latest Points Table:पंजाबला विजयाचा फायदा, गुजरातचा खेळ बिघडला; पाहा आयपीएलचे Latest Points Table IPL 2024 Latest Points Table:पंजाबला विजयाचा फायदा, गुजरातचा खेळ बिघडला; पाहा आयपीएलचे Latest Points Table Reviewed by Suraj Tate on April 05, 2024 Rating: 5

No comments:

Ad Home

Powered by Blogger.